शेणाच्या 'चाकोल्या झाल्या इतिहासजमा

शेणाच्या 'चाकोल्या झाल्या इतिहासजमा
Holi

होळी आणि धुळवड यांचं जसे रंगाशी नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याची आहे. काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायचा पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहित नाही. परंतु यवतमाळच्या (Yavatmal) दिग्रस सारख्या ग्रामीण भागात आजही ही परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळते. (Yavatmal Children Maintaining Holi Tradition)

आजची होळी म्हणजे लाकडे पेटवणे आणि दुसर्‍या दिवशी रंग खेळणे इथपर्यंतच मर्यादित आहे. पण पंचवीस तीस वर्षांपूर्वीची होळी आणि आजच्या होळीला बघाता आता बराच फरक पडलेला जाणवतो. होळी लाकडांची असली तरीही घरोघरी तयार केलेला शेणाच्या चाकोल्या होळीच्या पूजेच्या वेळी टाकल्या जायच्या. आई-बहिणींसोबत लहान मुलं होळीच्या पुजेला जायची. त्या वेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. 

आजही या चाकोल्यांचा वापर होळीच्या पुजेच्या वेळी केला जातो. यवतमाळच्या दिग्रस येथील धनवी दातीर, अनुष्का चिरडे, जानवी निचळ, रक्षा जाधव या चिमुकल्यांनी चाकोल्या तयार करत परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेणात हात भरवण्याची आणि शेणापासून चाकोल्या करण्याचा जो आनंद त्याची किंमत नव्या पिढीला कळणे कठीण आहे. (Yavatmal Children Maintaining Holi Tradition)
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com