राज्यभरात हजारो कोरोना रुग्णांची फरपट; रेमडेसिवीरचा अनेक ठिकाणी काळाबाजार

Remdesivir Injection
Remdesivir Injection

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वात प्रभावी ठरलेली आणि सरकरकडून मान्यता दिलेल्या महत्त्वाच्या औषधांमधील एक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाण्यासह (Mumbai, Thane) राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आहे. Remdesivir Shortage in Maharashtra Black Marketing Started

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोनारुग्णांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे.सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांनी मे-जून महिन्यांमध्ये रेमडेसिवीरची मागणी केल्यामुळे सध्या त्यांच्याकडे काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे. परंतु तुलनेने खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा जाणवत आहे. 

औषध कंपन्यांनी मध्यंतरी पुरवठा सुरळीत केले. नंतर सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने राज्यात रेमडेसिवीरचा (Remedesivir) तुटवडा जाणवत आहे.सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या मे-जून इतकी वाईट झाली आहे.

अनेक रुग्णालयातून रेमडेसिवीरची मागणी वाढल्याने उपलब्ध साठा संपत चालला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पालिका तसेच शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास मदत करणारे एका आरोग्यसेवा सल्लागाराने दिली. Remdesivir Shortage in Maharashtra Black Marketing Started

आयसीयू खाटांसाठी धावाधाव
मुंबईत आयसीयू (ICU) खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालिकेच्या सेव्हन हिल, नायर, बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमधील सर्व आयसीयू खाटा भरल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची खाटांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णांना दोन ते तीन दिवस खाटा मिळत नसल्याने त्यांचा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. 

अनेक रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. याशिवाय अनेक खासगी रुग्णालये त्याबाबतची व्यवस्था करण्यास सक्षम नाहीत. रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत आहे. याबाबत नुकतीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhana) यांच्याशी चर्चा केली.
- किरीट सोमय्या, भाजप नेते (BJP)


रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. रेमडेसिवीरची जादा किमतीने विक्री करणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- राजेश टोपे (Rajesh Tope), आरोग्यमंत्री

Edited By - Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com