कोविड सेंटरमधून चक्क रेमडिसिवीरचा बाॅक्सच झाला गायब...

डाॅ. माधव सावरगावे
बुधवार, 28 एप्रिल 2021

आतापर्यंत आपण रेमडीसीवर इंजेक्शनची चोरी, रेमडीसीवरचा काळा बाजार असे ऐकत होतो. आता तर चक्क रेमडीसीवर इंजेक्शनचा बॉक्सच गायब झालाय, या बॉक्समध्ये ४८ इंजेक्शन होते.

औरंगाबाद : आतापर्यंत आपण रेमडिसिवीर Remdisivir इंजेक्शनची चोरी, रेमडीसीवरचा काळा बाजार असे ऐकत होतो. आता तर चक्क रेमडिसिवीर इंजेक्शनचा बॉक्सच गायब झालाय, या बॉक्समध्ये ४८ इंजेक्शन होते. Remdisivir Box Stolen from Covid Centre of Aurangabad

ही घटना औरंगाबाद Aurangabad महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड सेंटरमध्ये घडलीय. याप्रकरणी महापालिका आरोग्य Health विभागातील पाच जणांना नोटिसा देण्यात आल्यात, आज संध्याकाळपर्यंत समाधानकारक उत्तर आले नाही आणि बॉक्सचा शोध लागला नाही तर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून Covid Center ४८ रेमडेसिविरीचा बॉक्स काल गायब झाल्याचे निदर्शनास आले. याची चौकशी करण्यासाठी काल सायंकाळी आरोग्य विभागातल्या स्टोअरमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्यात. Remdisivir Box Stolen from Covid Centre of Aurangabad

दोन दिवसांपूर्वी मेल्ट्रॉनसाठी इंजेक्शनचे तीन बॉक्स देण्यात आले होते. त्याची रीतसर नोंद करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. पण त्यापैकी दोनच मेल्ट्रॉनला पोहोचले. चोवीस तासांनंतर झालेल्या तपासणीत एक बॉक्स गायब झाल्याचे उघड झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी बॉक्सची जबाबदारी असलेल्यांना कारणे दाखवा नोटीस Show Cause Notice बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून बॉक्स कुठं गेला याबाबत माहिती आली नाही तर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live