कारंजा शहरात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या 75 वर्षीय आजीबाईंना जीवनदान

गजानन भोयर
रविवार, 2 मे 2021

वाशिम  च्या कारंजा शहरातील स्थानिक  विठ्ठल मंदिर परिसरात खोल विहीर आहे. या 40 फूट खोल असलेल्या विहिरीत अर्धअंगवायू (पॅरॅलीस) असलेल्या 75 वर्षीय विमल चौधरी या आजीबाई पडल्याची घटना आज घडली होती.

वाशिम : वाशिम Washim  च्या कारंजा Karanja शहरातील स्थानिक  विठ्ठल मंदिर परिसरात खोल विहीर Well आहे. या 40 फूट खोल असलेल्या विहिरीत अर्धअंगवायू असलेल्या 75 वर्षीय विमल चौधरी या आजीबाई पडल्याची घटना आज घडली होती. सदर घटनेची माहिती सर्वधर्म आपत्कालीन संस्थेला  देण्यात आली होती. Rescued 75 year grandmother who fell into a 40 foot deep well in the Washim city

माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पथक घटनास्थळी दाखल झाले.  स्थानिक प्रशासन Administration आणि आपत्कालीन संस्था यांनी त्या अजीबाईला सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला आहे. त्यांना स्थानिक कारंजा उपजिल्हा रुग्णालयात Hospital उपचारासाठी दाखल करण्यात  आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

विशेष म्हणजे 75 वर्षीय आजी विहिरीत पडल्यानंतर त्यांनी विहिरीत असलेल्या मोटारपंपचा पाईप पकडला. पाईप पकडल्यामुळे त्या पाण्यात बुडाल्या नाहीत. त्यामुळे जीव वाचवीने शक्य झाले. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

Edited By- Sanika Gade

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live