आजपासून आठच्या आत घरात; कोरोना टाळायला नवे नियम जारी

साम वृत्तसंथा
रविवार, 28 मार्च 2021

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार 15 एप्रिलपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाचा वाढता,प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहिर केली आहे. त्यानुसार 15 एप्रिलपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. Restriction at Night from Today in the wake of Corona Cases rising

पबमधली गर्दीमुळे कोरोना (Corona) वाढत असल्याचे लक्षात घेत आता रात्री 8 नंतर पाच जणांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पब, मॉल आणि समुद्रकिनारे अशा सर्व ठिकाणी आता रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत एकत्र येता येणार नाही.

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांच्या वेळांवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. 15 एप्रिलपर्यंत अटी लागू राहतील. रात्री आठनंतर हॉटेल बंद राहणार असून घरी पार्सल सेवा मात्र सुरू राहील. सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळावे आदींवर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळांमध्ये एका वेळेला किती व्यक्ती आत असाव्यात याचे नियम स्थानिक व्यवस्थापनाने तयार करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बागा आणि समुद्रकिनाऱ्यांवर निर्धारित वेळेनंतर जमावबंदी मोडून फिरणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. मास्क न घातलेला असल्यास त्या व्यक्तीस 500 रुपये दंड होईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस 1000 रुपये दंड होईल.

लग्नसमारंभाला 50 व्यक्ती हजर राहू शकतील. अंत्ययात्रेला केवळ 20 मंडळी उपस्थित राहू शकतील. खासगी आस्थापनांनी 50 टक्के कर्मचारी संख्येत काम करण्याचे ठरवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयात प्रवेशासाठी परवानगी आवश्‍यक आहे. परवानगी नसेल तर प्रवेशास बंदी असावी, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. Restriction at Night from Today in the wake of Corona Cases rising

घरातल्या कोरोना रुग्णाची जबाबदारी डॉक्‍टरांची
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र असे रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहेत. सरकारने नव्या नियमानुसार आता असे रुग्ण बाहेर आढळल्यास ती जबाबदारी उपचार करणाऱ्या डॉक्‍टरची असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live