VIDEO | रिया चक्रवर्तीला अखेर अटक, पाहा नेमकं काय घडलंय?

साम टीव्ही
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक करण्यात आलीय. थोड्यावेळापूर्वीच रियाला मेडिकल तपासणीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक करण्यात आलीय. थोड्यावेळापूर्वीच रियाला मेडिकल तपासणीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

याठिकाणी रियाची कोरोना चाचणीही होणारंय. त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलंय. ड्रग्ज प्रकरणी NCBकडून रियाला अटक करण्यात आलीय. NCB कार्यालयात रियाची तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली..त्यानंतर तिला अटक कऱण्यात आलीय.

 रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात NCBच्या अटकेत आहे. NCBनं NDPS ऍक्ट अन्वये रियाला अटक केलीय. याआधी NCBनं रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे.

पाहा आता पुढे काय हेणार या सविस्तर व्हिडिओतून...

संबंधित बातम्या

Saam TV Live