रिक्षा-टॅक्सी चालकांना हवीय भाडेवाढ  सामान्यांच्या खिशाला कात्री 

साम टीव्ही
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी जोर धरू लागलीय . 

मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी जोर धरू लागलीय. ही भाडेवाढ झाल्यास सामान्यांच्या खिशाला कात्री बसणारंय.

कोरोना संकटामुळे गेले 9 महिने घरी बसलेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांचा व्यवसाय आता कुठे पूर्वपदावर येतोय. त्यातच दररोज होणारी इंधन दरवाढ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागलीय. आधीच कर्जाचा डोंगर त्यात कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा ही चिंता रिक्षा-टॅक्सी चालकांना लागलीय. त्यामुळे भाडेवाढ मिळावी अशी मागणी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून जोर धरू लागलीय. 

  मुंबईत नुकतीच महानगर प्रदेश प्राधिकरणाची बैठक झाली.या बैठकीला विविध विषयांवर बरोबरच भाडेवाढीची चर्चा होणं अपेक्षित होतं, माञ ही चर्चा पुढे ढकलण्यात आली.  मात्र लवकरच होणाऱ्या महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत रिक्षाची संख्या ही 2 लाख इतकी आहे. तर टँक्सींची संख्या 48 हजार इतकी आहे. सध्या रिक्षाचं किमान मीटरभाडं 18 रुपये आहे. तर टॅक्सीचे भाडं 20 रुपये आहे . 

भाडेवाढ केल्यास रिक्षाचं किमान भाडं 20 आणि टॅक्सीचे मीटरभाडं 25 रुपये होऊ शकतं. कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट आणि इंधन दरवाढीचा फटका या दोन्ही गोष्टी पाहता रिक्षा-टॅक्सी चालकांचा मागणी रास्त आहे. मात्र यात पुन्हा एकदा भरडला जाईल तो सामान्य माणूसच . 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live