INDIA vs CHINA | लडाख सीमेवर भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाढता तणाव

साम टीव्ही
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

ANI या वृत्तसंस्थेनेही पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचे, तसेच भारत-चीन यांच्यातील तणाव वाढल्याचे वृत्त दिलंय..

बातमी आहे लडाख सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमधील वाढत्या तणावाची. गेल्या तीन महिन्यांपासून लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे असलेल्या भारत आणि चीन सैनिकांमध्ये, पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडल्याचा दावा करण्यात येतोय. काल रात्री लडाख सीमेवर गोळीबार झाल्याचे वृत्त असून भारतीय सेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने गोळीबाराचा दावा केलाय. भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश करत गोळीबार केल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सने केलाय. ANI या वृत्तसंस्थेनेही पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचे, तसेच भारत-चीन यांच्यातील तणाव वाढल्याचे वृत्त दिलंय.

गेल्या तीन महिन्यांपासून लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे असलेल्या भारत आणि चीन सैनिकांमध्ये, पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडल्याचा दावा करण्यात येतोय. काल रात्री लडाख सीमेवर गोळीबार झाल्याचे वृत्त असून. भारतीय सेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने गोळीबाराचा दावा केलाय. भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश करत गोळीबार केल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सने केलाय. ANI या वृत्तसंस्थेनेही पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचे, तसेच भारत-चीन यांच्यातील तणाव वाढल्याचे वृत्त दिलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live