कोरोना लशीच्या साइड इफेक्टचा धोका? तयार राहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

साम टीव्ही
बुधवार, 16 डिसेंबर 2020
  • कोरोना लशीच्या साइड इफेक्टचा धोका?
  • केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्यक्त केली भीती
  • तयार राहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

कोरोनावर लस कधी येणार याची प्रतीक्षा साऱ्या देशाला लागून राहिलीय..लसीकरणासाठी केंद्रानं जय्यत तयारी केलीय. मात्र लशीच्या साईड इफेक्टची बातमी आल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढलीय. कुणी दिलाय हा धोक्याचा इशारा, पाहूयात एक रिपोर्ट

ब्रिटन, रशिया, अमेरिका यासारख्या देशांमध्ये कोरोनाची लस देण्यात सुरूवात झालीय. तर भारतात डिसेंबर अखेरीस कोरोनाची लस येईल असा दावा केला जातोय. लसीकरणासाठी केंद्रानं व्यापक मोहिम हाती घेतलीय. लसीकरण मोहिम सुरू होण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

कोरोना लशीबाबत नागरिकांमध्ये काहिशी भीती निर्माण होऊ शकते. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जाते तेव्हा काही नागरिकांवर त्याचे विपरीत परिणामही दिसून येऊ शकतात असं वक्तव्य राजेश भूषण यांनी केलंय. 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या आठवड्यात आणखी काही कंपन्यांना करोनावरील लशींच्या क्लिनिकल चाचण्यांची मंजुरी दिलीय. सध्या सहा कंपन्यांकडून करोनावरील लशींच्या चाचण्या सुरू आहेत. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवरीत देशात लसीकरण मोहीम सुरू होईल अशी माहिती आहे. अशातच केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलेलं हे वक्तव्य सर्वांचीच चिंता वाढवणारं आहे. असं असलं तरी लोकांनी लगेच घाबरून चालणार नाही. परदेशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मोजके अपवाद वगळता कुठलेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोना लसीबाबत आपणही आशावादी राहायला हरकत नाही. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live