दीपिका, प्रियंकाला मागे टाकत रिया चक्रवर्ती बनली 'मोस्ट डिझायरेबल'

Riya Chakraborty becomes 'Most Desirable women 2020
Riya Chakraborty becomes 'Most Desirable women 2020

नवी दिल्ली - टाइम्स मोस्ट डिझायरेबल वूमन २०२० Times 50 Most Desirable Women मध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty अव्वल स्थानावर आली आहे. ही यादी अवघ्या ३ दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या ५० मोस्ट डिझायरेबल मॅन मध्ये प्रथम स्थानी असेलेला दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतने Sushant singh Rajput प्रथम स्थान मिळवल्यानंतर जाहीर झाली आहे. Riya Chakraborty becomes 'Most Desirable women 2020'

यापूर्वी २०२० मध्ये सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात २८ वर्षीय अभिनेत्रीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनही मिळाला होता.

टाईम्स ५० मोस्ट डिजायरेबल वुमन २०२० या यादीमध्ये विविध क्षेत्रांतील ४० वर्षांखालील महिलांचा समावेश आहे. ज्यांनी गेल्या एका वर्षात त्यांच्या क्षेत्रात ठसा उमटविला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. अंतर्गत निर्णायक मंडळासह Internal jury ऑनलाइन मतदानात Poll केलेल्या मतांवर आधारित ही रँकिंग आहे. 

“गेल्या वर्षी रिया सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींपैकी एक होती. तिने स्वतः कधी कल्पनाही केली नसेल अश्या कारणासाठी ती चर्चेत आली होती. सुशांत सिंग राजपूत याच्या आकस्मिक निधनाने रिया मीडिया मध्ये चर्चेत आली होती. या आत्महत्या प्रकरणात ती जबरदस्तीने ढकलली गेली आणि रात्रभरात तिचे आयुष्य कायमचे बदलले.

चक्रवर्ती नंतर ऍडलिन कॅस्टेलिनो (मिस युनिव्हर्स २०२० - तिसरा क्रमांक) आणि दिशा पटानी यांनी दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले. कियारा अडवाणी चौथ्या क्रमांकावर आणि दीपिका पादुकोण चक्क पाचव्या क्रमांकावर आहेत. कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिज, अनुपिया गोयनका, रुही सिंह आणि अवृत्ती चौधरी यांनी अनुक्रमे सहावे, सातवे, आठवे, नववे आणि दहावे स्थान मिळविले आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com