BIG BREAKING | रिया चक्रवर्तीला कोणत्याही क्षणी सीबीआयकडून अटक होण्याची शक्यता

साम टीव्ही
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020
  • रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून अटक
  • "रियानं विषप्रयोग करून सुशांतची हत्या केली"
  • सुशांत सिंहच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
  • रिया चक्रवर्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी
  • सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची मागणी

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपासाला वेग आलाय. सीबीआयची टीम रिया चक्रवर्तीच्या घरी  दाखल झालीय. त्यामुळे रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केलेत. रियानं माझ्या मुलावर विष प्रयोग करुन त्याची हत्या केली, असा आरोप सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी केलाय. रिया चक्रवतीला तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केलीय. 

दरम्यान, रिया च्रकवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय. रियाचे वडिल इंद्रजीत यांना काही कागदपत्रं घेऊन ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. बँकेतील लॉकरची चावीही त्यांना मागण्यात आल्याचं समजतंय. ईडीच्या कार्यालयातून रियाचे वडिल निघाले असून ते पुन्हा आपल्या घरी परतलेत.

रिया चक्रवर्ती म्हणते, माल संपला, व्हॉट्सऍप चॅटमध्ये लपलंय ड्रग्ज कनेक्शनसह सुशांतच्या मृत्यूचं गुढ?

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासाला वेग आलाय. या प्रकरणी सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीची आजही चौकशी सुरू आहे. सिद्धार्थ पिठाणी DRDOच्या गेस्ट हाऊसमध्ये आज दाखल झालाय. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवतीचीही आज सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. सुशांतचा कुक निरजचीही आज चौकशी केली जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live