निसर्ग चक्रीवादळाचा हाहकार! पाहा, कोकणासह मुंबईची काय आहे परिस्थिती...

साम टीव्ही
बुधवार, 3 जून 2020

निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या किनारपट्टीवर धडकलंय. जोरदार वाऱ्यांनी किनारपट्टी परिसरात हाहाकार माजवण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून, काही बिल्डिंगचे आणि घरांचे पत्रेही उडून गेले आहेत. तर किनाऱ्यावर नांगरलेल्या जहाजांनाही या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसतोय. प्रलयकारी निसर्ग चक्रीवादळ मुरुड ते रेवदंडा दरम्यान किनारपट्टीवर धडकलंय. या चक्रीवाळामुळे समुद्र खवळलाय़. निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ताशी 100 ते 150 किमी वेगानं वारे वाहतायेत.

निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या किनारपट्टीवर धडकलंय. जोरदार वाऱ्यांनी किनारपट्टी परिसरात हाहाकार माजवण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून, काही बिल्डिंगचे आणि घरांचे पत्रेही उडून गेले आहेत. तर किनाऱ्यावर नांगरलेल्या जहाजांनाही या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसतोय. प्रलयकारी निसर्ग चक्रीवादळ मुरुड ते रेवदंडा दरम्यान किनारपट्टीवर धडकलंय. या चक्रीवाळामुळे समुद्र खवळलाय़. निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ताशी 100 ते 150 किमी वेगानं वारे वाहतायेत. त्यामुळे पुढील काही तास कोकण आणि मुंबईची कसोटी पाहणार आहेत. वादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोली, गुहागर या किनारी भागांना बसू शकतो. त्या तुलनेत रत्नागिरी आणि राजापूरच्या किनारी भागाला कमी फटका बसेल, अशी शक्यता आहे.

सध्या अलिबागमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर पाहायला मिळतोय. या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याचं पाहायला मिळतंय. अलिबागमध्ये पुढील काही तास वादळाचा प्रकोप जाणवेल असाअंदाज वर्तवला जातोय. 

निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकलंय. दरम्यान कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत असून लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय.. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडालेत. मुरुड येथेही घरांचे पत्रे उडाल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झालेत

निसर्ग चक्रीवादळाचा धोका असतानाच संपूर्ण कोकणात तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोळतोय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागांत मोठमोठी झाडं कोसळीयत, या वाऱ्यानं असं रौद्ररूप धारण केलंय की, काही भागांत घरांवरील पत्रे अक्षरशः कागदासारखे उडून गेलेत. अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत.. दापोली आणि श्रीवर्धनमधली ही दृश्य पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडालाय.

अलिबागमध्ये वादळानं आपलं रौद्ररुप धारण केलंय. आणि आता या वादळाची मुंबईच्या दिशेने वेगात वाटचाल सुरु झालीये. या वादळाचा वेग सुमारे ९०-११० किमी प्रतितास असा आहे. संध्याकाळपर्यंत हे वादळ मुंबई- ठाण्यात धडक देणार आहे. त्यामुळे पुढचे 4 तास हे मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. एनडीआरएफने लोकांना या चक्रीवादळापासून सतर्क राहण्यास सांगितलंय. रात्री 12 ते 4 पर्यंत वादळाचा सर्वाधिक जोर असेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live