कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची खासगी हॉस्पिटल्सकडून लूट

साम टीव्ही
गुरुवार, 21 मे 2020
  • ठाण्यात सुरू आहे रूग्णांची लूट?
  • खासगी प्रयोगशाळांकडून सदोष चाचण्यांचा घाट?
  • कोरोना झाल्याचं भासवून फसवणूक केली जात असल्याचा संशय 

दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतोय. दुसरीकडे  किरकोळ आजारी असलेल्या रूग्णांची खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लॅबकडून अक्षरश: लूट सुरू आहे. ठाण्यात असे प्रकार सर्रास वाढले आहेत.

देशात कोरोनाचा कहर वाढत चाललाय. ठाण्यासारख्या शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीय. मात्र इथं कोरोनाची भीती दाखवून लोकांची अक्षरश: लूट सुरूयं. ठाण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत 15  मे रोजी 44 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा निष्कर्ष या प्रयोगशाळेनं काढला. यापैकी काही रुग्णांना कोणतीही लक्षण नव्हती. प्रशासनानं या रुग्णांची महापालिका प्रयोगशाळेत फेरतपासणी केली. यापैकी पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित प्रयोगशाळेला कारणे दाखवा नोटीस बजावलीय..

खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालातून काही सवाल उपस्थित होतायेत. 
साम टीव्हीचे सवाल 

  • लागण नसताना कोरोना भासवून महागडय़ा
  • रूग्णालयांमध्ये पाठवण्याचा घाट घातला जातोय का?
  • यात रूग्णालयं आणि प्रयोगशाळांचं साटंलोटं आहे का? 
  • खासगी प्रयोगशाळा ‘आयसीएमआर’नं आखून दिलेल्या नियमांचंही पालन करत नाहीत का?
  • लॉकडाऊनमुळे सध्या अतिशय बिकट स्थिती आहे. उत्पन्नाचे मार्ग नसल्यामुळे अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलाय. अशात लोकांना धीर देण्याचं सोडून खासगी रूग्णालयं आणि प्रयोगशाळा लुटमार करत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैवं ते काय? 
     


संबंधित बातम्या

Saam TV Live