रोहीत पवार अमित ठाकरे यांना म्हणतात...

सरकारनामा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

रोहित पवार यांचा सोशल मीडियावर  मोठा चाहता वर्ग आहे.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील

मुंबई:  राजपुत्र अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करताच  त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

रोहित पवार म्हणतात, ' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तिगत पातळीवर एकमेकांना कायमचं सहकार्य राहील.

राजकारणापलीकडे जात ते सर्वांसह मैत्रीपुर्ण संबंध जोपासण्यावर भर देतात.   रोहित पवार यांचा सोशल मीडियावर  मोठा चाहता वर्ग आहे. दोनच दिवसांआधी त्यांनी आपल्याच मतदारसंघातील तरूणाच्या सलुनमध्ये जात केसं कापली होती. त्यांच्या या साधेपणाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत होती. 
 

WebTittle :: rohit-pawar-amit-thackeray


संबंधित बातम्या

Saam TV Live