..म्हणून रोहित पवारांनी कर्जतमधील सलूनमध्ये कटिंग केली!

सरकारनामा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आपला लाडका नेता जिथे-जिथे जाईल, तिथे कार्यकर्ते गर्दी करत असतात. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची क्रेझ कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांमध्ये दिसते. कर्जतमध्ये रोहित पवार हेअरकट करण्यासाठी गेले असता, तिथेही कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. मतदारसंघातील चांगला कारागीर म्हणून याच ठिकाणी आपण केस कापायला आल्याचं रोहित पवार यांनी सांगितले.

कर्जत (नगर) : आपला लाडका नेता जिथे-जिथे जाईल, तिथे कार्यकर्ते गर्दी करत असतात. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची क्रेझ कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांमध्ये दिसते. कर्जतमध्ये रोहित पवार हेअरकट करण्यासाठी गेले असता, तिथेही कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. मतदारसंघातील चांगला कारागीर म्हणून याच ठिकाणी आपण केस कापायला आल्याचं रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार पवार कर्जतच्या ‘ओम नागेश्वर मेन्स पार्लर’मध्ये हेअरकट करण्यासाठी गेले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.निवडणुकीच्या धावपळीतही याच सलूनमध्ये त्यांनी केस कापले होते, त्यावेळचा किस्साही रोहित पवार यांनी आवर्जून सांगितला. ‘त्यावेळी इथल्या सगळ्या कारागिरांनी मला आमदार होण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. अखेर त्या शुभेच्छा कामी आल्या आणि लोकांनी मला भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून दिलं.’ अशी आठवण पवार यांनी सांगितली. या वेळी शाल आणि श्रीफळ देऊन तेथील कारागिरांनी आमदार पवार यांचा सत्कार केला.  

स्थानिक कारागिरांना रोजगार मिळावा
व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा केस कापायलाही वेळ मिळत नाही. मग मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या सलूनमध्ये जाण्याऐवजी मतदारसंघात एक चांगला कारागीर असलेल्या ठिकाणी केस कापायला काय हरकत आहे. यानिमित्ताने स्थानिक कारागिरांनाही रोजगार मिळतो, असे विचार आमदार पवार यांनी व्यक्त केले.
 

WebTittle ::  rohit pawar chooses karjat hairdresser


संबंधित बातम्या

Saam TV Live