रोहित पवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर, वाढीव वीजबिल आणि औरंगाबाद नामांतरणावरून दिली ही प्रतिक्रिया

साम टीव्ही
गुरुवार, 21 जानेवारी 2021

वाढीव वीजबिल आणि औरंगाबाद नामांतरणावरून मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

वाढीव वीजबिल आणि औरंगाबाद नामांतरणावरून मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलताना रोहित पवार यांनी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा असल्याचा टोला शिवसेनेला लगावलाय. वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले  पाहा -

वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे, यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास करावा असंही त्यांनी  म्हटलंय. कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल असंही त्यांनी म्हटलंय. सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.


संबंधित बातम्या

Saam TV Live