रोहित पवार यांनी कोविड सेंटरमध्ये धरला झिंगाट गाण्यावर ठेका

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

सध्या अनेक लोकप्रतिनिधी कोरोना रुग्णांसाठी मैदानात उतरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काल रोहित पवार यांनी कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेट दिली. यावेळी रोहित पवार यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी चक्क सैराटमधील झिंगाट गाण्यावर ठेका धरत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

कर्जत - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. सध्या अनेक लोकप्रतिनिधी कोरोना रुग्णांसाठी मैदानात उतरले आहेत. Rohit Pawar zingat dance in covid centre

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काल रोहित पवार यांनी कर्जत Karjat येथील कोविड सेंटरमध्ये Covid Centre रुग्णांना भेट दिली. यावेळी रोहित पवार यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

रोहित पवार यांनी चक्क सैराटमधील झिंगाट गाण्यावर ठेका धरत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या रोहित पवारांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे आहे. रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. रोहित पवार यांनी काल या कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. Rohit Pawar zingat dance in covid centre

लसीकरणांसाठी आता सरकारी केंद्रावर रजिस्ट्रेशनची गरज नाही   

रोहित पवार व्हिडीओ ट्विट करत म्हणाले की, गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live