ओपन स्काय करारातून रशिया पडला बाहेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

joe biden and putin
joe biden and putin

ओपन स्काय नियंत्रण (Treaty on Open Skies) करारावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी स्वाक्षरी केल्याने ते या करारातून बाहेर पडले आहेत. या करारानुसार सदस्य देशांना अवकाशात शस्त्र उडवण्याची अनुमती होती. रशियाने आशा दर्शविली होती की राष्ट्रपती पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन या महिन्यात होणाऱ्या बैठकीत या करारावर चर्चा करतील. परंतु, बायडन सरकारने रशियाला सांगितले की अमेरिका या करारातून बाहेर पडल्यामुळे ते चर्चेत सामील होणार नाही. अमेरिका या करारातून 2020 मध्येच बाहेर पडला आहे. (Russia fell out of the Treaty on Open Skies)     

काय होता कराराचा हेतू?
ओपन स्काय कराराचा उद्देश रशिया आणि पश्चिमी देश यांच्यात विश्‍वास वाढविणे आहे. त्याचबरोबर, सदस्य देशांच्या सैन्य आणि त्यांच्या क्रियाकलापांविषयी माहिती गोळा करण्याची परवानगी देणे, तसेच सदस्य देशांच्या सैनिकी क्षेत्रावरून उड्डाणे करणे हा होता. 1992 मध्ये झालेल्या या करारामध्ये तीन डझनहून अधिक देश सहभागी होते.

हे देखील पाहा

एक वर्षांपूर्वी झाली होती घोषणा
माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते की अमेरिका ओपन स्काय करारातून माघार घेणार आहे. रशियाने या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. सद्यस्थितीत अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनानेही मे महिन्यात माजी राष्ट्रपतींच्या निर्णयावर ठाम रहायचे ठरवले. दुसरीकडे रशियाने हा करार संपुष्टात आणल्याबद्दल अमेरिकेला दोष दिला आहे. गेल्या आठवड्यात रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने हा करार रद्द करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला होता. 24 मार्च 1992 रोजी हेलसिंकीमध्ये दोन्ही देशांनी ओपन स्काईज करारावर स्वाक्षरी केली.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com