रशियाच्या लसीची भारतातही निर्मिती होणार?

साम टीव्ही
सोमवार, 17 ऑगस्ट 2020
  • रशियाच्या लसीची भारतातही निर्मिती होणार?
  • भारतातील कंपन्यांमध्ये लस बनवण्यास रशिया उत्सुक
  • भारतात कुणाला मिळणार सर्वात आधी लस? 

कोरोनावर लसीची निर्मिती केल्याची घोषणा रशियाने केली आणि संपूर्ण जगाच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यातच आता भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आलीय. रशियाने बनवलेल्या लसीचं उत्पादन आता भारतात होण्याची शक्यता आहे.

कोरोनावर यशस्वी लस बनवल्याच्या रशियाच्या घोषणेमुळे जगभरात आशादायक वातावरण निर्माण झालंय. कोरोनावरील लसीची रशियात मोठ्या प्रमाणात निर्मितीही सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र आता हीच रशियाची लस भारतातही बनण्याची शक्यता आहे. 

रशियाची लस भारतात बनणार?
रशियाने बनवलेल्या लसीचं उत्पादन जगातील 5 देशांमध्ये करण्याचा रशियाचा विचार आहे. दरवर्षी 500 मिलियन डोस बनवण्याचं उद्दिष्टही रशियाने निश्चित केलंय. कोरिया, ब्राझिलसह भारतासोबतही रशियाने चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे रशियाने बनवलेल्या लसीचं उत्पादन भारतातही होण्याची चिन्ह आहेत. रशियाने बनवलेली लस जगभरातील 5 देशांसह भारतातही बनण्याची चिन्ह असली तरी, ही लस प्राधान्यानं कुणाला मिळणार याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

आधी लस कुणाला मिळणार?
कोरोनावरील लस सर्वात आधी कोरोनाग्रस्तांसाठी वापरली जाईल. त्यानंतर कोरोना वॉरियर्स म्हणजेच डॉक्टर, नर्स, पोलिस आणि इतर आरोग्यसेवकांना ही लस देण्यात येईल. त्यानंतर लहान मुलं आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतरच सामान्य लोकांसाठी ही लस उपलब्ध करण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात चाचपडत असताना रशियाने आशेचा मोठा किरण दाखवलाय. त्यामुळे ही लस लवकरात लवकर येवो आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, अशीच आशा प्रत्येकजण करतोय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live