भारतातील 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार रशियाची स्पूटनिक व्ही

भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस या लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहे.
स्पुटनिक व्ही
स्पुटनिक व्हीTwitter/@ANI

वृत्तसंस्था,

नवी दिल्ली : देशात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन Covaxin लस आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड Covishield लस या लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहे. यात आता आणखी एक लसीची भर पडणार आहे. रशियाची Russia कोरोना प्रतिबंधक लस स्पूटनिक व्ही Sputnik V ही लसदेखील भारतात कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. (Russia's Sputnik V will be available in 9 cities in India)

यात विशेष बाब म्हणजे, भारतातील काही शहरांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहेत. यात बंगळुरु, मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम, बद्दी, कोल्हापूर आणि मिरयालागुडा यासह आणखी 9 शहरांमध्ये ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती स्पुटनिक व्हीच्या अधिकृत ट्विटर हँडलने दिली. रशियन लसीचे स्थानिक वितरण भागीदार डॉ. रेड्डीज यांनीही बुधवारी एक निवेदन जारी केले होते. यानुसार, रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक व्ही सुरवातीला फक्त हैदराबादमध्येच लाँच करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आता स्पुटनिक व्ही लस देशातील इतर नऊ शहरांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. रेड्डीजने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हे देखील पहा -

स्पुटनिक व्ही लसीची पायलट लॉन्च प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दोन्ही डोसची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात असल्याचेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठी हैदराबादस्थित डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांनी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) सह भागीदारी केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या स्पुतनिक व्ही रोलआऊटचा पहिला टप्पा 17 मे रोजी हैदराबादमध्ये आणि 18 मे रोजी विशाखापट्टणममध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला होता. अपोलो रुग्णालयांव्यतिरिक्त, हैदराबादमधील कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमध्ये देखील ही लस उपलब्ध आहे.

स्पुटनिक व्ही
12वी मूल्यांकनासाठी CBSE कडून 30-30- 40 चा फॉर्म्युला

केंद्र सरकारने जारी केलेल्या किंमतीच्या पत्रकानुसार खासगी रुग्णालयांमध्ये स्पुटनिक व्हीच्या डोसची किंमत 1145 रुपये इतकी असणार आहे. दरम्यान, आरडीआयएफने यापूर्वी 10 जून रोजी बहरैनच्या आरोग्य मंत्रालयाने स्पुटनिक व्ही लस 94.3 टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले होते.

Edited By - Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com