SAAM SPECIAL | चांगभलं! वाईटातही ही चांगली बातमी

साम टीव्ही
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

 

  • वाईटातही चांगली बातमी. चिमुकल्यांनी हरवलं कोरोनाला. 
  •  
  • 43 टक्के लहान मुलांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज
  • संकटाच्या अंधारात चांगल्या बातमीचा प्रकाश

कोरोनाचं संकट आल्यापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणावाचं सावट आहे. कोरोनामुळे जगभरातून काळजी वाढवणाऱ्याच बातम्या येतायत.  पण अशा सगळ्या वातावरणात काही चांगल्या गोष्टीही घडतायत. या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. साम टीव्हीचा विशेष उपक्रम.  चांगभलं.  आजच्या चांगभलंमध्ये आम्ही दाखवणार आहोत.  कोरोनाला लहानग्यांनी कसं लोळवलंय. पाहूयात.

 

कोरोनाचं संकट आल्यापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणावाचं सावट पडलंय. पण या संकटाच्या अंधारात उजेडाची आशा देणाऱ्या घटना घडतायत.  त्यातलीच एक बातमी म्हणजे जगभरातील तब्बल 43 टक्के लहान मुलांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज निर्माण झाल्यायत.  लंडनमधील एका संशोधन संस्थेने अभ्यासानंतर हा दावा केलाय.

लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटने जगभरातील अनेक लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी केली. तेव्हा जगातील तब्बल 43 टक्के मुलांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज असल्याचं आढळून आलं.

कोरोनाचा राक्षस हल्ला करताना गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद करत नसल्याचं आपल्या समोर आहे. मात्र, या परिस्थितीतही लहान मुलांनी कोरोनाला नुसती मातच दिलेली नाहीय तर, त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटिबॉडीजही निर्माण झाल्यायत. ही बातमी आपल्या सर्वांना धीर देणारी आहे. कोसळून गेलेल्या प्रत्येकाला उमेद देणारी आहे.  पण  तरीही कोरोना अजून गेलेला नाही.  आपण कोरोनाविरोधातील लढाईचे अनेक टप्पे यशस्वी पार केलेत. पण लढाई अजून संपलेली नाही.  त्यामुळे विजय विजय मिळेपर्यंत संयम आणि शिस्तीचं शस्त्र म्यान करता कामा नये.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live