परळ, करी रोड पुलाच्या गर्डर कामासाठी मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

परळ, करी रोड पुलाच्या गर्डर कामासाठी मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक... CSMT ते दादर वाहतूक 6 ते 8 तासांसाठी राहणार बंद..

मध्य रेल्वेवरील परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी रविवार ४ फेब्रुवारी रोजी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल सेवा सहा ते आठ तासांपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे दादरहून सीएसएमटीकडे जाण्यासाठी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडावेत असं आवाहन रेल्वेने केले आहे. गर्डर उभारताना संपूर्ण मार्गावरील विद्युतपुरवठा खंडीत करण्याची आवश्यकता असते, त्यामुळे सावधगिरी बाळगत सहा ते आठ तासांसाठी हा प्रवाह खंडीत करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live