लग्नाकरिता मुलगी दाखवून लाखोंची फसवणूक! तुम्हीही अशा जाळ्यात फसू शकता! वाचा सविस्तर

साम टीव्ही
सोमवार, 25 जानेवारी 2021

 

  • लग्नाकरिता मुलगी दाखवून लाखोंची फसवणूक 
  • मुलाकडच्या मंडळींना लाखोंचा गंडा 
  • अकोल्यात लुटारू टोळीचा पर्दाफाश 

लग्नासाठी मुली दाखवून मुलाकडच्या मंडळींना लाखोंचा चुना लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीचे कारनामे ऐकाल तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. कशाप्रकारे ही टोळी जाळं विणून लोकांची फसवणूक करायची?

बुरख्याआड असलेले हे आरोपी, लग्नाचं आमिष दाखवून तरूणांना सुखी संसाराचं आमिष दाखवणाऱ्या या लुटारूंना आता जेलची हवा खावी लागणारंय. अकोल्यातल्या डाबकी रोड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीचे कारनामे ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ही टोळी लग्नासाठी इच्छूक असलेली मुलं हेरायची. लग्नासाठी त्यांना सुंदर मुलगी दाखवली जायची. मुलगी पसंत पडताच दीड दोन लाख रूपये द्या आणि लग्न करून मुलीला घेऊन जा अशी बतावणी करायची. आणि नंतर पैसे घेऊन पोबारा करायची. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील राहुल पाटील हा तरूण याच आमिषाला बळी पडला. आपलं ज्या मुलीसोबत लग्न लावून देण्यात आलं ती आपली पत्नी नसून या टोळीच्या गटातीलच एक असल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानं लागलीच डाबकी रोड पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या टोळीला जेरबंद केलंय. 

त्यामुळे तुम्ही अशा भामट्यांपासून सावध राहा. मुलगी दाखवून लग्नाचं आमिष दाखवत कुणी पैशांची मागणी करत असेल तर त्याला बळी पडू नका. नाहीतर तुमचीही फसवणूक होईल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live