सचिन तेंडुलकर कोरोना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल...

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

आज सचिन कोरोनाच्या पुढील उपचारासाठी रुग्णायलात दाखल झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तो रुग्णालयात दाखल झाला आहे, अशी माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून  दिली आहे.

मुंबई :  काही दिवसांपूर्वी देशाचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले होते. कोरोना (Corona) झाल्याचे समजताच सौम्य लक्षणांमुळे सचिन होम क्वारंटाइन झाला होता. कोरोनावर घरीच उपचार सुरु असल्याची महिती सचिनने त्याच्या ट्विटर हॅन्डल वरून चाहत्यांना दिली होती. Sachin Tendulkar get hospitalized for precautionary measures  

मात्र आज शुक्रवारी सचिन कोरोनाच्या पुढील उपचारासाठी रुग्णायलात दाखल झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तो रुग्णालयात (Hospital) दाखल झाला आहे, अशी माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंट वरून  दिली आहे. यामुळे चाह्त्यांच्या काळजीत त्याने आणखीनच भर टाकली आहे. 

यासंदभात त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे  मी आभार मानतो. दक्षता म्हणून मी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार  रुग्णालयामध्ये दाखल झालेलो आहे. लवकरच पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा करत आहे. तसेच सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आणि सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचे विश्वचषक विजयाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन देखील केले. Sachin Tendulkar get hospitalized for precautionary measures 

माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकरला  गेल्या २७ मार्चला कोरोनाची लागण झाली होती. स्वत: सचिन तेंडुलकरने याबाबत ट्विट (Tweet) करुन माहिती दिली होती. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आलेली आहे. मी माझी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी  काळजी घ्या, असे सचिन तेंडुलकरने ट्विट मध्ये म्हटले होते. याच दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनीदेखील चाचणी केली असून त्यात सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह (Negative) आला आहे. 

Edited by-Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live