सचिन वाझे whatsapp status मुळे पुन्हा एकदा चर्चेत ! पाहा काय होतं त्यांचं whatsapp status.

साम टीव्ही
रविवार, 14 मार्च 2021

हिरेन मृत्यू प्रकरणातील आरोपाने वाझे व्य़थित?

सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ
का झाले सचिन वाझे निराश?

 

 

 

 

सध्या वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सचिन वाझेंच्या व्हॉट्स अप स्टेटसमुळे खळबळ माजलीय. वाझेंनी या स्टेटसद्वारे व्यक्त केलेल्या भावना म्हणजे निराशा आहे की अटकेची भीती? अशी चर्चा त्यामुऴे सुरू झालीय.

हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यामुळे अगोदरच चर्चेत असलेले गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मात्र यावेळी त्यांच्या व्हॉटसअॅप स्टेटसमुळे ते चर्चेत आलेत. 

3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने 
गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा.
 जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.

वाझेंच्या या व्हॉट्सअप स्टेटसबाबत सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त होतायत.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतरही तूर्तास तरी ठाकरे सरकारने वाझेंना निलंबनापासून अभय दिलंय. मात्र हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. साम टीव्ही 
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live