Breaking मनसुखची हत्या करण्यासाठी वाझेने केला लोकलचा प्रवास

सूरज सावंत
शनिवार, 3 एप्रिल 2021

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सध्या एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने लोकल ट्रेनने प्रवास केल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या सीएसएमटी समोरील जीपीओ जवळील सिग्नलवरील सीसीटिव्ही मध्ये सचिन वाझे कैद झाला आहे.

मुंबई : मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सध्या एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने लोकल ट्रेनने (Local Train) प्रवास केल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या सीएसएमटी (CSMT) समोरील जीपीओ (GPO) जवळील सिग्नलवरील CCTV मध्ये सचिन वाझे कैद झाला आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणे कठीण असल्याने वाझे मोबाइल आॅफीसला ठेवून ठाण्याला लोकलंनं गेल्याचे तपासात समोर आले आहे. Sachin Waze Traveled by Local Train before Mansukh Hiren Murder

लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून वाझेने हे मोबाइल (Mobilie) कार्यालयात ठेवून एका मिञाला तो उचलण्यासाठीही ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.

दरम्यान वाझे सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर ७ च्या सुमारास CCTVमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर तो ठाणे (Thane) स्थानकाबाहेर दिसला आहे. पुन्हा लकलनेच प्रवास करून तो  भायखळ्याला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सोबत त्याचे मोबाइल घेऊऩ आणण्यास सांगितले.

हे केल्याने एकेक करून ते सर्व लोकेशन एकञ दिसतील आणि वाझेंवर कुणाला संशयही येणार नाही, असा डाव होता. माञ मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए (NIA) कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण घटनास्थळी होते. वाझेचा यात रोल काय याचा तपास करत आहे. हिरेनची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्याचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Sachin Waze Traveled by Local Train before Mansukh Hiren Murder

माञ शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरही आता रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरेन हा संशयित व्यक्ती असताना, त्याचा मृतदेहाच्या शवविच्छेदनाचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग का केलं नाही. शवविच्छेदनावेळी डाँक्टरांनी वाझेची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली, याची माहिती NIA घेत आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live