भाजपला पाठिंबा दिल्याने 'या' माजी जवानाने पक्षाला केला रामराम 

भाजपला पाठिंबा दिल्याने 'या' माजी जवानाने पक्षाला केला रामराम 

चंदिगड : भारतीय लष्करात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा व्हिडिओ समोर आणणारे माजी जवान तेज बहादूर यादव यांनी हरियानातील मतमोजणीनंतर भाजपला पाठिंबा दिल्याने जननायक जनता पक्षाला (जेजेपी) रामराम केला आहे. 

तेज बहादूर यांनी म्हटले आहे, की भाजप हेच जेजेपी असल्याचे उघड झाले आहे. जेजेपी हा पक्ष भाजपचाच पुत्र आहे. जेजेपीचे सत्य आता जनतेसमोर आले आहे. मी पूर्वीपासूनच वाटत होते. चार दिवस मी झांशीच्या कारागृहात असताना मला कोणीही भेटायला आले नव्हते. 

हरियानात बहुमतापासून सहा जागा दूर असलेल्या भाजपला अखेर दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टी म्हणजे जेजेपीच्या दहा आमदारांची साथ मिळाली आहे. हरियानाच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुख्यमंत्री हा भाजपचा तर उपमुख्यमंत्री "जेजेपी'चा असेल, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केले. त्यामुळे चिडलेल्या तेज बहादूर यांनी पक्ष सोडला आहे. 

Web Title: Sacked BSF jawan Tej Bahadur quits JJP over Dushyant Chautala's alliance with BJP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com