मराठा आरक्षण - फडणवीस तुम्ही परत या...सदाभाऊ खोतांचे आवाहन

विजय पाटील
बुधवार, 5 मे 2021

मराठा समाजातील सत्तेमधील सरदाराच्या मुळे आरक्षण Maratha Reservation मिळाले नाही. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात भक्कम पणे बाजू मांडता आली नाही, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी येथे केली.

सांगली : मराठा समाजातील सत्तेमधील सरदाराच्या मुळे आरक्षण Maratha Reservation मिळाले नाही. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात भक्कम पणे बाजू मांडता आली नाही, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी येथे केली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी परत यायला हवे, असेही मत खोत यांनी व्यक्त केले. Sadabhau Khot reaction about Maratha Reservation Verdict By Supreme Court

मराठा समाजातील सत्तेमधील सरदारांच्यामुळे आज पर्यंत आरक्षण मिळाले नाही, तसेच या राज्य सरकारला Maharashtra Government सुप्रीम कोर्टात भक्कम पणे बाजू मांडता आली नसल्याने मराठा आरक्षण रद्द करण्यात असे सदाभाऊ खोत यांनी म्हणाले. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते. महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने रद्द ठरवले आहे. या बाबत घटनापीठापुढे आज सुनावणी झाली, याबाबत आता राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

दरम्यान, आता  आम्ही आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या गाड्या पेटवून देऊ, असा इशारा  मराठा आरक्षण समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरात दिला आहे. आम्ही मराठा बांधव अर्ध नग्न झालोय, आत्ता या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना सुध्दा सगळी कपडे काढून मारल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. सरकारच्या निषेध म्हणून आज येथील मराठा समजाच्या कार्यकर्त्यांनी  सामुहिक मुंडण केले. Sadabhau Khot reaction about Maratha Reservation Verdict By Supreme Court

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना न्यायालयात योग्य बाजू मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मांडण्यात आली होती मात्र या सरकारला न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षण कायदा रद्द झाला अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live