ट्रोल करणारा कुठल्याही पक्षाचा असेल तरी तो भxxच - सदाभाऊंचे वक्तव्य

विजय पाटील
गुरुवार, 13 मे 2021

अजित पवार यांनी सोशल मीडियावर सहा कोटी खर्च केले आहेत, अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

सांगली : अजित पवार यांनी सोशल मीडियावर सहा कोटी खर्च केले आहेत, अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व काँग्रेसने अनेकांना ट्रोल ठेवण्यासाठी माणसे ठेवली आहेत. ट्रोल करणारा कुठल्याही पक्षाचा असेल तरी तो भXXXच असे वक्तव्य खोत यांनी केले आहे. Sadabhau Khot Reacts on Ajit Pawar Social Media Account Expenses

हे देखिल पहा - 

करोनामुळे राज्यात मोठे आर्थिक संकट आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोशल मीडिया हाताळण्यासाठी सरकार जवळपास सहा कोटी रुपये खर्च करणार आहे, असल्याचे वृत्त एका  इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. अजित पवार राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा आदेश जारी केल्याचे वृत्त या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी बाहेरील एजन्सीवर सोपवण्यात येणार आहे

पोलिस उपनिरिक्षक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण होणार सुरु

याबाबत खोत म्हणाले, "राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या  सोशल मीडियासाठी पैसे खर्च केले जात असतील तर ही दुर्देवी बाब आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे. जनतेच्या अनेकांना ट्रोल करण्यासाठी माणसे ठेवली आहेत. हे ट्रोल कोणत्या xxxचे आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. जनतेला लुबाडण्याचे काम हे सरकार करत आहे,'' ट्रोल करणारा कुठला ही पक्ष्याचा असला तरी तो xxx असेही कोत म्हणाले. Sadabhau Khot Reacts on Ajit Pawar Social Media Account Expenses
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live