..तर कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीवर धडकू- सदाभाऊ खोतांचा इशारा

Sadabhau Khot
Sadabhau Khot

सातारा : दोन दिवसात रेमडिसिव्हर करोनाग्रस्त रुग्णांना उपलब्ध झाले नाहीत तर अचानक कोरोनाग्रस्त रुग्णांना घेऊन मी मातोश्रीवर जाणार असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना वैद्यकीय सेवांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्या पार्श्वभूमीव खोत यांनी हा इशारा दिला आहे. Sadabhau Khot Warns Uddhav Thackeray about Remdisivir 

रेमडिसिवीर हे सध्या कोरोनाच्या आजारावर प्रभावी ठरत असल्याने या इंजक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा राज्यात जाणवू लागल्याने रुग्णांना प्राणाला मुकावे लागत आहे. याच बाबत बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी आक्रमक होत सरकार वर जोरदार टीका केली असून इशारा ही दिला आहे. सरकारने या परिस्थिती मध्ये खंडण्या गोळा करायचे बंद करून दोन दिवसात जर रेमडिसिवीर उपलब्ध करून दिले नाही तर कोरोनाग्रस्त रुग्ण घेऊन मी मातोश्रीवर धडकणार असा इशारा देखील दिला आहे.

साताऱ्यात नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई

दरम्यान, कराड पाटण रोड वरील काही भागांमध्ये प्रशासनाने अनोख्या पद्धतीने कारवाई सुरू केली आहे. विना कारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची प्रशासनाच्या वतीने जागेवरच अँटीजेन टेस्ट केली जात असून त्यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना तेथूनच ऍम्ब्युलन्स मधून पुढील उपचारांसाठी न्हेण्यात येत आहे.
कराड पाटण मार्गावर पाटणनजीक  प्रशासनाकडुन कडक कारवाईसाठी कोरोना चाचणी कारवाईचा बडगा उगारला जाग्यावरच तपासणी करुन बाधीत रुग्नाला रुग्नवाहीकेतुनच कोविड सेंटरला रवाना.  नागरिकांच्यात भीतीचे वातावरण 
पोलिस महसूल आरोग्य व पंचायत समिती विभागाकडून एकत्रित कारवाईचा हा नवीन फंडा शोधून काढला आहे.
Edited By - Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com