सहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष

Saam Banner Template
Saam Banner Template

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. पावसाळा सुरू होताच गेल्या दोन दिवसात उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.  त्यामुळे पहिल्याच पावसात सहस्त्रकुंड धबधब्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीलाच सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. धबधब्याचा अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात येतो. हा धबधबा उमरखेड पासून 70 किलोमीटर वर तर यवतमाळपासून 181 किलोमिटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळयाचे पारणे फेडत आहे. (Sahasrakund waterfall attracts the attention of tourists)

30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. मनमोहक दृश्य पाहण्याचा पर्यटकांचा आनंद काही औरच आहे.  काही दिवसात वरुण देवाची लवकरच कृपा झाल्याने हा धबधबा पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले आणि धबधबे तुडुंब भरून वाहत आहेत. परंतु, कोरोनामुळे काही लोक घरा बाहेर पडलायला घाबरत आहे. तसेच काही लोकांना बाहेर पडायचे आहे ,परंतु सरकारने अजून नियम पाहिजे तेवढे शिथिल केलेले नाहीत. काल लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी सरकारच्या नियमाला डावलत गर्दी केली होती. महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे हेच धबधबे, नद्या , किल्ले, थंड हवेची ठिकाणे. परंतु आलेले कोरोनाचे संकट राज्यातील जनतेला घरात डांबवून ठेवत आहे.   

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com