सई ताम्हणकरने घेतला आहे एक महत्त्वपूर्ण निर्णय...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा स्टायलिश आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. पण आता सईने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. ती म्हणते, "ट्‌विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर मी नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायलाही आवडतो. पण काही काळ मला स्वतःसाठी वेळ हवा आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मी हे करणार आहे.' सईचे इन्स्टाग्रामवर नऊ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत; तर ट्विटरवर 79 हजारांपेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात. आता एक महिना तरी ती या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणार आहे. एक महिन्यानंतर सई तिच्या चाहत्यांसाठी काही नवं सरप्राईज घेऊन येणार का? हे पाहायचंय.

Web Title: Sai Tamhankar will no use social media for one month 

संबंधित बातम्या

Saam TV Live