शिर्डीचे साई मंंदीर कोरोनामुळे बंद 

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

कोरोनामुळे साई मंदिराची दरवाजे बंद. आज सायंकाळपासून ते 30 एप्रिल पर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

शिर्डी : कोरोना (Corona) पुन्हा एकदा महाराष्टात हाहाकार माजवू लागला आहे. लसीकरणांनंतरही (Vaccination) कोरोना स्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी राज्य सरकार अनेक पर्यायांचा अवलंब करीत आहे. The Sai temple is closed due to corona

कोरोना हॉटस्पॉट असलेले ठिकाण पूर्णपणे सिल केले जात आहेत. मंदिरे, हॉटेल्स, तसेच जमावाला बंदी घालण्यात आले आहे. कोरोना मुळेच आता पुन्हा नगर (Nagar) जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबांचे (Saibaba) मंदिर भाविकांसाठी बंद होत आहे. 5 ते 30 एप्रिल साई मंदिर (Sai Mandir) दर्शनासाठी बंद राहील. 

आज सायंकाळपासून ते 30 एप्रिल पर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याची माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे. यासोबतच शिवाय साई संस्थांची भक्त निवास व्यवस्था या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीन सुद्धा बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादलायात रुग्णालय व इतर सेंटरच्या रुग्णांसाठीच फक्त जेवण बनवलं जाणार आहे. अशी माहिती देण्यात अली आहे. साई संस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्यांदा साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. 

Edited By- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live