'सकाळ'चे बातमीदार संदीप जगदाळे यांचे निधन

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

सकाळचे हडपसर भागातील बातमीदार संदीप जगदाळे यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते

पुणे : सकाळचे हडपसर भागातील बातमीदार संदीप जगदाळे यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते. Sakal Newspaper Reporter Sandip Jagdale Passes Away

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत होते. कोरोनाचा काळात देखील ते जबाबदारीने कर्तव्य बजावित होते. बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी हडपसर भागातील अनेक विषय मांडत आवाज उठविला होता. विविध विषयावर सातत्याने पाठपुरावा करून त्या भागातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्या भागातील सामजिक, राजकीय विषयावर ते उत्कृष्टपणे बातमीदारी करत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था आणि संघटनांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले होते. त्यांच्या जाण्याने विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. Sakal Newspaper Reporter Sandip Jagdale Passes Away

हडपसरमधील युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या साधना कन्या विद्यालयामधील शिक्षिका सारिका संदीप जगदाळे यांच्या त्या पत्नी होत. संदीप जगदाळे (मुर्टी, ता. बारामती) शेतकरी कुटुंबातील होते. ते शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. त्यानंतर ते हडपसर येथे स्थायिक झाले. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. सुमारे 20 दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज (गुरूवार) त्यांचे निधन झाले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live