सावधान! तुम्ही घेतलेली मिठाई विषारी तर नाही ना! नाशकात काय घडलंय वाचा...

साम टीव्ही
रविवार, 15 नोव्हेंबर 2020
  •  
  • दिवाळीच्या तोंडावर सुरूय भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री
  • नाशकात दीड कोटींचे बनावट अन्नपदार्थ जप्त
  • पैशांसाठी केला जातोय लोकांच्या जिवाशी खेळ

तुम्ही जर दिवाळीच्या दिवसात रेडिमेड मिठाई किंवा इतर पदार्थ खरेदी करत असाल तर सावध राहा...कारण ऐन सणासुदीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थांची सर्रास विक्री सुरूंय. हे पदार्थ तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतात. 

दिवाळी म्हंटली की मिठाई, फराळ आलाच. अलिकडच्या काळात तयार मिठाईला लोकांची पसंती वाढलीय. शिवाय बऱ्याच गृहिणी बाजारातून तयार अन्नपदार्थांची खरेदी करतात. पण बेफिकीर राहून असे जिन्नस घेऊ नका. कारण नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलीय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून 1 कोटी 48 लाख 36 हजार रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आलेत. सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा वापर मिठाई बनवण्यासाठी केला जातोय. 
 

पाहा व्हिडिओ -

आधीच कोरोनामुळे सर्वांच आरोग्य धोक्यात आलंय. त्यात असे बनावट अन्नपदार्थ तुमची चिंता आणखी वाढवू शकतात. ही कारवाई नाशिकमध्ये झालेली असली तर अशा भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री सर्वत्रच सुरूंय. त्यामुळे तुम्हाला तुमची दिवाळी आरोग्यदायी आणि आनंदात जावी असं वाटत असेल तर अशा भेसळयुक्त पदार्थांबाबत सजग राहा...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live