राज्यात साडेबारा लाख लिटर दारूची विक्री

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 7 मे 2020

विक्री सुरू असलेल्या दुकानांची संख्या १० हजार ८२२ इतकी आहे, असे वळसे पाटील म्हणाले. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राज्यातील ३३ जिल्ह्यात सशर्त दारूविक्री सुरू आहे तर काही जिल्ह्यांत दारूविक्री बंद आहे. 

आजपर्यंत विविध प्रकारची साडेबारा लाख लिटर दारू विक्री झाली आहे. त्याची किंमत ४३ कोटी ७५ लाख रुपये इतके आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी येथे दिली. गेल्या रविवारपासून म्हणजे ३ मेपासून लॉकडाउनच्या काळात सीलबंद दारू विक्री सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलीय.   

विक्री सुरू असलेल्या दुकानांची संख्या १० हजार ८२२ इतकी आहे, असे वळसे पाटील म्हणाले. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राज्यातील ३३ जिल्ह्यात सशर्त दारूविक्री सुरू आहे तर काही जिल्ह्यांत दारूविक्री बंद आहे. 

बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ X७ सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक- १८००८३३३३३३, व्हाट्सअँप क्रमांक- ८४२२००११३३ हा असून ई-मेल- commstateexcise@gmail.com असा आहे.

WebTittle :: Sales of 12.5 lakh liters of liquor in the state

संबंधित बातम्या

Saam TV Live