रूग्णाला दिलं वैधता संपलेलं सलाईन, मग काय झालं? तुम्हीच वाचा...

SAAM TV
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

रूग्णाला दिलं वैधता संपलेलं सलाईन कोल्हापुरातल्या छ.प्रमिलाराजे रूग्णालयातील धक्कादायक प्रकार रूग्णाच्या नातेवाईकांची शल्यचिकित्सकांकडे तक्रार

रूग्णाला दिलं वैधता संपलेलं सलाईन कोल्हापुरातल्या छ.प्रमिलाराजे रूग्णालयातील धक्कादायक प्रकार रूग्णाच्या नातेवाईकांची शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली.

रूग्ण बरा व्हावा म्हणून त्याला सलाईन लावली जाते. पण ही सलाईन रूग्णाच्या जीवावरही बेतू शकते. कारण तिची वैधता केव्हाच संपलीय. हा धक्कादायक प्रकार घडलाय. कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयात...इथं पेठ वडगावमधील महादेव खंदारे यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली...मात्र त्यावरील वैधतेची मुदत केव्हाच संपली होती. रूग्णाच्या नातेवाईकांनी लागलीच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याउलट तुमचा रूग्ण दगावला का? असं उत्तर त्यांना मिळालं. रूग्णालयाच्या निष्काळजी कारभाराविरोधात खंदारे यांच्या मुलानं जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल केलीय. 
 या खळबळजनक प्रकारानंतर शासकीय यंत्रणांची धावाधाव सुरू झालीय. चौकशी करून दोषींवर कारवाई होईलही मात्र शासकीय रूग्णालयात असे प्रकार वारंवार घडू लागलेत. अलिकडेच नाशिकमध्ये प्रसुती कक्षात झुरळ फिरत असल्याचा प्रकार समोर आला होता तर नागपुरात चक्क एक कुत्राच रूग्णांच्या वॉर्डात फिरत असल्याचं समोर आलं होतं. मुळात सरकारी रूग्णालयात उपचारासाठी येणारे रूग्ण हे गरीब कुटुंबातील असतात. या हॉस्पिटलवर सरकार लाखो रूपये खर्च करतं. मग तिथे जर रूग्णांच्या जिवाशी खेळ होत असेल तर सामान्यांनी कुणाच्या भरवशावर उपचार घ्यावेत, हा खरा प्रश्न आहे. 

 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live