सलमानला मिळाल बर्थडे गिफ्ट

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 28 डिसेंबर 2019

अर्पिताला काल सकाळी ८च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. आता तिने मुलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर होते. अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली असून तिला अहिल नावाचा एक लहान मुलगा आहे. अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहे.

 बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा काल  ५४ वा वाढदिवस झाला. आणि आज त्यांच्या दुहेरी आनंद मिळाला आहे. कारण हा वाढदिवस साजरा करत असताना सलमानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सलमानची बहिण अर्पित खानला कन्यारत्न झाल
 आहे.
 आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. सलमान खानला बॉक्स ऑफिस किंग, टागर ऑफ बॉलिवूड, भाईजान, सल्लू अशी अनेक विशेषणे त्याच्या नावापुढे लावण्यात येतात. 

अर्पिताला काल सकाळी ८च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. आता तिने मुलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर होते. अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली असून तिला अहिल नावाचा एक लहान मुलगा आहे. अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहे.

सलमान त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर साजर करण्याऐवजी भाऊ सोहेल खानच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण सलमनाने त्याचा वाढदिवस तिच्या मुलांसोबत साजरा करावा अशी अर्पिताची इच्छा होती. त्यामुळे सलमान कुठेही न जाता त्याचा वाढदिवस घरीच साजरा करत आहे.

दरम्यान, सलमानने यंदा वाढदिवस सेलिब्रेट करणार नसल्याचं सांगितलं जात होत. 'दबंग ३'चं प्रमोशन करत असताना त्याने ही माहिती दिली होती. "यंदा माझ्या वाढदिवसाचा कोणताच प्लान आखलेला नाही. माझी बहिण अर्पिता प्रेग्नंट आहे. त्यामुळे मला माझ्या पूर्ण वेळ तिला द्यायचा आहे", असं सलमानने सांगितलं.

WebLink :: Salman gets Birthday Gift

संबंधित बातम्या

Saam TV Live