VIDEO | सलमान खानच्या हत्येचा कट फसला, त्या शार्पशुटरला अटक, पाहा नेमकं काय घडलं?

साम टीव्ही
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

पंजाब, हरयाणा, राजस्थान या राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या लॉरेंस बिश्नोई गँगच्या रडारवर  सलमान खान असल्याचं समजतंय. सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याऱ्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पंजाब, हरयाणा, राजस्थान या राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या लॉरेंस बिश्नोई गँगच्या रडारवर  सलमान खान असल्याचं समजतंय. सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याऱ्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आल्याचं समजतंय. यापैकी एकजण शार्प शूटर राहूल उर्फ सांगा उर्फ बाबा याला 15 ऑगस्टला पोलिसांनी उत्तराखंड इथून अटक केलीय. सलमानच्या वांद्रे इथल्या बंगल्याची रेकी करण्यात आल्याचंही समोर येतंय. मात्र लॉकडाऊनमुळे सलमानच्या हत्येचा कट फसल्याचं पोलिस तपासात समोर आलंय. 

पाहा, सविस्तर नेमकं घडलं काय?