बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाळू माफियांकडून आव्हान... 

विनोद जिरे
बुधवार, 19 मे 2021

बीड जिल्ह्यातकोरोनाचा आकडा वाढत असल्याने, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. यादरम्यान अत्यावश्यक असणारे किराणा दुकान देखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मात्र जिल्ह्यातील किराणा दुकान बंद असताना, वाळूच्या हायवा सुसाट असल्याचे चित्र बीड शहरात पाहायला मिळत आहे. 

बीड - बीड जिल्ह्यातकोरोनाचा आकडा वाढत असल्याने, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. यादरम्यान अत्यावश्यक असणारे किराणा दुकान देखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मात्र जिल्ह्यातील किराणा दुकान बंद असताना, वाळूच्या हायवा सुसाट असल्याचे चित्र बीड शहरात पाहायला मिळत आहे. Sand mafias challenge Collector's order in Beed

वाळूने भरगच्च भरलेले हायवा, वाळू माफिया बिनधास्त पणे चेकपोस्ट वरून घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे या वाळूच्या हायवांचे नंबर खोडलेले असतात.मात्र याकडे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, दुर्लक्ष करत आहेत.जर एखादा पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ता वाळू भरून चाललेला हायवा पाहून बोलला, तर त्यावर किरकोळ दंडाची कारवाई केली जाते.

तर दुसरीकडे हेच पोलीस अन महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना विविध कारणे दाखवून दंड आकारताना मागेपुढे पाहत नाहीत.एवढेच नाही तर अनेक सर्वसामान्य नागरिकांवर  गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे.Sand mafias challenge Collector's order in Beed

विशेष म्हणजे बीडमध्ये फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, तहसीलदार शिरीष वमने यांच्यासह अनेक अधिकारी अन कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करत असतात.

हे देखील पहा -

या दरम्यान ज्यांचे आई, वडील, भाऊ, मुलगा, ऍडमिट आहे अश्या अनेक नागरिकांना पकडलं गेलं होतं. तर एक महिला मला जाऊद्या माझी आई सिरीयस आहे.मला तिची फिस हॉस्पिटमध्ये भरायची आहे.अस म्हणत विव्हळत होती.मात्र तिच्यावर कोणतीच दयामाया पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवली नाही आणि तिचा अर्धा तास वेळ घालून तिला दंड आकारण्यात आले. मग एकीकडं सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई होत असतांना दुसरीकडं मात्र वाळू माफियांना सूट दिली जात आहे.  Sand mafias challenge Collector's order in Beed

पाथरीत कापड दुकानदाराला पन्नास हजारांचा दंड

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉकडाउनच्या आदेश हे फक्त सर्वसामान्य नागरिकांना आहेत का ? ज्या चेकपोस्टवर डब्बा घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई होते त्यांच्या दुचाकीच्या चाव्या काढल्या जातात. एवढंच नाही तर अनेकांना काठीचा प्रसाद देखील दिला जातो. यामुळं या कडक लॉकडाऊनमध्ये गडगंज असणाऱ्या वाळू माफियांना सूट दिली आहे का ? असा प्रश्न आता बीडमधील नागरिकांतून विचारला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live