सांगली पॅर्टन जळगावात भाजपला टेंन्शन महापोर निवडणुकी आधीच 27 नगरसेवक नॅाट रिचेबल

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुक होणार आहे येत्या १८ मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे

 

जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुक होणार आहे येत्या १८ मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे या दरम्यान रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते.मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर गेल्याची माहीती सूत्रांकडून मिळाली यामूळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे  रविवारी दुपारी दोन वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते.

दुपारी तीनच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाउसवर एकत्र झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या नंतर  सायंकाळी सातच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत धक्का दायक वातावरण निर्माण झाल आहे ह्या नगरसेवकांनी शिवसेनेशी ‘गट्टी’ करत भाजपला हादरा देण्याचे ठरवले आहे भाजपचे ५७ पैकी तब्बल २७पेक्षा अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे  महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीला चार दिवस शिल्लक असतानाच महापालिकेत असा राजकीय भूकंप झाला आहे आणि हे २७ नगरसेवक मुंबईत रवाना होऊन शिवसेनेशी ‘गट्टी’ करत भाजपला हादरा देण्याचे ठरवले आहे 

याआधी ही सांगलीमध्ये भाजपकडं बहुमत असूनही जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम करून राष्ट्रवादीचा महापौर केला ह्याच सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती आता जळगावही करण्यात आली महापालिकेतील भाजपची सत्ता उलथविण्यासाठी शिवसेने फासे टाकले आणि  त्या नंतर जळगावातील २७ नगरसेवकांनी शिवसेनेशी ‘गट्टी’करत भाजपला हादरा दिला.

असे आहे बलाबल 
भाजप : ५७ 
शिवसेना : १५ 

एमआयएम : ०३ 
एकूण : ७५ 
 
नगरसेवक गायब झाल्यानंतर 
भाजप : ३० 
गायब झालेले : २७ (अंदाजे) 
शिवसेना : १५ 
एमआयएम : ०३ 

                                                                                             सिद्धी चासकर 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live