सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्सालींची आज चौकशी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 जुलै 2020

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्सालींची आज चौकशी होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांची चौकशी केलीय. सुत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी यांच्या दोन चित्रपटांसाठी सुशांतला ऑफर देण्यात आली होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्सालींची आज चौकशी होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांची चौकशी केलीय. सुत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी यांच्या दोन चित्रपटांसाठी सुशांतला ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही प्रोजेक्टमधून सुशांतला काढण्यात आलं. त्यामुळे चौकशीसाठी संजय लीला भन्साळी यांना समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान कास्टिंग डिरेक्टर शानू शर्माचीही पुन्हा चौकशी होणार असंही समजतंय. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणात कंगना आणि शेखर कपूर यांचा थेट संबंध नसल्याचं पोलिसांनी म्हंटलंय.

आत्महत्ये मागची सर्व कारणे पडताळणी जात आहेत.   या प्रकरणात आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.सुशांतच्या आर्थिक गुंतवणूक व कंपनीत रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांतसोबत शेवटात म्हणजेच ‘दिल बेचारा’ मध्येकाम करणारी अभिनेत्री संजना सांघीला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स केले होते. पोलिसांनी संजनाला सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र शुटींगच्या तारखेत व्यस्त असल्यामुळे संजनाने पोलिसांना मंगळवारी चौकशीला हजर राहिली. पोलिसांनी तब्बल 7तास तिची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. काही महिन्यांपूर्वी 'मी-टू कैम्पेन' सुरू असताना संजनाने सुशांतवर तिची छेड काढल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तिने सुशांतसोबत चॅटचे फोटो ही सोशल मिडियावर  टाकल्याचे कळते.  त्यावेळी सुशांतने या आरोपाचे खंडन केले होते.
मंगळवारी सुशांतची बहिण आणि त्याचा मित्र महेश शेट्टी यांनी तपास अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे ही कळते. दोघांनी सुशांतच्या आत्महत्येचे कारण काही स्पष्ट झाले आहे का हे जाणून घेतल्याचे कळते. त्याच बरोबर सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात तो भाड्याने रहात होता. त्या घराचे भाडे लाखोरुपये आहे. त्यामुळे ते घर म्हणजे च सुशांतच्या त्या घरातील वस्तू घेऊन ते घर खाली करण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.  त्याच बरोबर सुशांतचे जे बँक अकांऊन्ट पोलिसांनी बंद केले आहेत. ते सुरू करण्याबाबत ही पोलिसांकडे विनंती केल्याचे कळते.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. तो नैराश्यावर ट्रीटमेंट देखील घेत होता. सुशांत नेमका कोणत्या कारणांमुळे नैराश्यात होता याचा तपास आता पोलिस करत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत २८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याच प्रकरणी आज भन्साळींची चौकशी होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live