तोल ढासळणाऱ्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टीका   

Saam Banner Template (31).jpg
Saam Banner Template (31).jpg

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis  यांनी राष्ट्रवादीचे NCP  अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. फडणवीस यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याचं नमूद केलं आहे. Sanjay Raut has strongly criticized Chandrakant Patil

संजय राऊत Sanjay Rautयांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चंद्रकांत पाटलांवर Chandrakant Patil जोरदार टीका केली आहे. ते म्हणले की, तोल ढासळणाऱ्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात अशी टीका संजय राऊत यांनी केली. चंद्रकांत पाटील उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी मोदींना पत्र लिहितील असं देखील ते म्हणले आहे.  

तसेच संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करत म्हणले की, देवेंद्र फडणवीस हे एक दिवस नक्कीच मातोश्रीवरही येतील. तसंच यावेळी त्यांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू व दुश्मन असू शकत नाही. महाराष्ट्रातील परंपरा आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले असतील तर त्यांचे स्वागत आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहे पण लोकशाहीत संवाद असयला हवा, महाराष्ट्रात ही परंपरा आहे.त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घऱी गेले असतील तर स्वागत करायचा पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut has strongly criticized Chandrakant Patil

हे देखील पहा -

पुढे ते म्हणले की, देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्ष आता टीकाच करायची. विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणे.फडणवीस यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी कोरोना संकटात मदत योजना ,महागाई, वादळ, यासंदर्भात बोलले पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केले पाहिजे.

फडणवीस यांचे दु:ख समजून घेतले पाहिजे. माझ्यामुळे सत्ता गेल्याची वेदना आहे. मी त्यांचे दु:ख समजतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो असा टोला राऊतांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com