VIDEO | राऊत-फडणवीस भेट आणि कंगनाप्रकरणावरुन संजय राऊतांचा इशारा, वाचा पत्रकार परिषदेतील राऊतांचे महत्वाचे मुद्दे

साम टीव्ही
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020
  • 'मध्यावधीबाबत चंद्रकांत पाटलाचं वक्तव्य सकारात्मक'
  • 'देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनं कुणीही नाराज नाही'
  • फडणवीसांची मुलाखत अन एडिडेट असेल-राऊत
  • महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनाही राऊतांचा इशारा

उद्धव ठाकरेंचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. मध्यावधी निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य सकारात्मक आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठीनं कुणीही नाराज नाही.

मुलाखतीसाठी फडणवीसांना पुन्हा एकदा भेटेनं असही त्यांनी म्हंटलंय. फडणवीसांची मुलाखत अन एडिटेड असेल, पुढच्या काळात राहूल गांधी आणि अमित शहांची मुलाखतही घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलंय. तर महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना त्यांनी कडक इशारा दिलाय. दात उचकटले तर त्यांचे दात घशात जातील अशा शब्दात राऊतांनी बदनामी करणाऱ्यांचे कान उपटले आहेत. 

पाहा यासंदर्भातील राऊतांचा सविस्तर व्हिडिओ -

दरम्यान, कंगना प्रकरणावरुन संजय राऊत आक्रमक झालेत...षंढासारखं गप्प बसणार नाही, महाराष्ट्राची बदनामी केली तर उसळून उठू असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.

जुहू इथल्या कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिलाय. 

पाहा कंगनाप्रकरणावरुन राऊतांनी काय सुनावलंय?

 


संबंधित बातम्या

Saam TV Live