""राज्यपालांवर आमचं अन्‌ आमच्यावर त्यांचं प्रेम ''

साम टिव्ही
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

शिवसेनेच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव आहे. तेज तराफ बोलणारी आणि देशाबाबत माहिती असणारी अभिनेत्री विधान परिषदेवर गेली तर उत्तमच असे सांगत राज्यपालावर आमचं आणि आमच्यावर त्यांचं किती प्रेम आहे हे देशाला माहीत आहे.

 

शिवसेनेच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव आहे. तेज तराफ बोलणारी आणि देशाबाबत माहिती असणारी अभिनेत्री विधान परिषदेवर गेली तर उत्तमच असे सांगत राज्यपालावर आमचं आणि आमच्यावर त्यांचं किती प्रेम आहे हे देशाला माहीत आहे.

ते कोणताही राजकीय बखेडा निर्माण करणारी नाही, ते सूज्ञ आहेत असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना अमेरिका निवडणूक, नितीशकुमार आणि राज्यातील विधान परिषद निवडणुकीबाबत भाष्य केले. राऊत म्हणाले, की राज्यपाल घटनेविरोधात काम करणार नाहीत. राज्यपालांना विनंती, आपल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करू. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तिन्ही पक्षांनी दिली आहे.

आता निर्णय राज्यपाल घेणार आहेत.महाराष्ट्राचा सरकार हे लोकशाही मार्गाने घटनात्मक पूरक कायद्याचा आधार घेऊन सत्तेत आले. राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहे. त्यांच्या मताचा आदर आम्ही करतो पण, कॅबिनेट निर्णय त्यांना स्वीकारावं लागत. कॅबिबतने यादी पाठवली आहे ती घटनेत राहून पाठवली आहे. 

बिहार निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी राजदचे नेते तेजस्वी यादवांचे तोंडभरून कौतुक केले तसेच मुख्यमंत्री नितीशकुमारांवर टीकाही केली. ते म्हणाले, की तेजस्वी यादवांकडून खूप अपेक्षा आहे. परिवर्तनची आस आहे. जंगलराज खूप ठिकाणी चालत. नितीशजी आपली खेळी खेळून झाले आहे. आम्हाला त्यांचा आदर आहे. नितीशकुमार याना सन्मानपूर्वक बिदाई द्यायला हवी आहे. जनता रिटायर करणार आहे. 

अमेरिकेतील निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले, की भारतातील लोकशाही मजबूत आहे. अमेतीकेतील तमाशा हिंदुस्थानात होणार नाही. इंदिरा गांधी हरल्यावर 10 मिनीटात राजीनामा देऊन घरी गेल्या होत्या. भारतीय लोकशाही परिपक्व आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी चांगले नेतृत्व झाले नाही त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार. हरल्यावर हे खुर्ची सोडू शकत नाही. उलट भारतात शांतपणे सत्तांतर झाले. जनतेची भीती हिंदुस्थानात आहे


संबंधित बातम्या

Saam TV Live