प्रशांत किशोर आता शिवसेनेबरोबर??.. गडबड करू नका, सगळं कळेल..!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मुंबई- प्रशांत किशोर यांच्याविषयी सर्व माहिती हळूहळू बाहेर येईल. गडबड करू नका, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवसेना खासदारांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी भाषणही केले. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, युती करण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही आणि प्रचाराची रणनीतीही प्रशांत किशोर ठरवणारा नाहीत, ते नेमके शिवसेनेसाठी काय काम करतील ते हळूहळू बाहेर येईल आणि ते सर्वांना समजेल. 

दरम्यान, 2019च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचं प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर यांच्या हाती दिलं जाण्याची चर्चा सध्या प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेनेचं निवडणूक प्लॅनिंग हे प्रशांत किशोर ठरवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 भारतीय जनता पक्षासाठी यशस्वीरित्या लोकसभा निवडणूक कॅम्पेन केले होते.

हे सरकार अण्णांच्या जीवाशी खेळत आहे
आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून, हे सरकार अण्णा हजारे यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. शिवसेनेचा अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Sanjay Raut speak about Prashant Kishor On Mathoshree To Meet Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live