संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे निधन

विश्वभूषण लिमये
गुरुवार, 22 एप्रिल 2021

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार पवित्र   रमजान Ramadan महिन्यात पैगंबरवासी झाले..आज दुपारी दीड वाजता घरीच देह सोडला.गेल्या महिन्यापासून ते अस्वस्थ होते. मृत्यूसमयी   ते ८७ वर्षाचे होते.

सोलापूर : पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार पवित्र   रमजान Ramadan महिन्यात पैगंबरवासी झाले..आज दुपारी दीड वाजता घरीच देह सोडला.गेल्या महिन्यापासून ते अस्वस्थ होते. मृत्यूसमयी   ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा बदिउज्जमा बिराजदार (नावाजलेले गझलकार साबीर शोलापुरी या नावाने प्रसिद्ध आहेत) मुली व नातवंडे असा परिवार आहे. Sanskrit Scholar Pandit Gulam Dastagir Birajdar Passes Away

बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या Solapru अक्कलकोट Akkalkot तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत Sanskrit शाळेत त्यांचे शिक्षण Education झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले. बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. या ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत.

दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदाच्या ऋचांचा समावेश होता.

बिराजदार यांना एकूण १८हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांपैकी काही -
राष्ट्रीय-शिक्षक-पुरास्कार केन्द्र शासनं १९८३
संस्कृत-पण्डित्याय राष्ट्रपति पुरस्कार १९९८
महाराष्ट्र राज्य-संस्कृत-पण्डित-पुरस्कार: महाराष्ट्र विधानसभा,१९९३
उज्जैनहून परशुरामश्री
तिरुपतीहून वाचस्पती
नाशिकहून विद्यापारंगत
वाराणसी येथून महापण्डित आणि पण्डितेंद्र
सोलापूरहून संस्कृतरत्नम्‌

पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी २०१८मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे २१-१-२०१८ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. Sanskrit Scholar Pandit Gulam Dastagir Birajdar Passes Away

त्यांचे "संस्कृत लेखक" वर्गातील लेख पुढील प्रमाणे आहेत.

अभिनवगुप्त
काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर
वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर
अशोक नरहर अकलूजकर

केशव रामराव जोशी

गुलाम दस्तगीर

वासुदेव गोपाळ परांजपे

रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live