अजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा

 अजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा
Ajit Pawar

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित Ajit Pawar पवारांनी पुण्याच्या Pune पोलीस Police आयुक्तांसह  त्यांच्या सहकाऱ्यांची आज भल्या सकाळी  शाळा घेतली. शिवाजीनगर Shivajinagar येथील मुख्यालयातील नूतनकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या उदघाटनासाठी अजित पवारांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र अजित पवारांनी झालेल्या कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. Ajit Pawar Gave lessons to Senior Police Officers in Pune

मला बोलवायचं असेल तर चांगली काम करा, असली छा-छू कामं चालणार नाहीत, बारामतीला Baramati येऊन बघा कशी काम केलंय, असा सणसणीत टोला देखील अजित पवारांनी लगावला. 

हे देखिल पहा

अजित पवार नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे ओळखले जातात आणि विकास कामात जर कोणी निष्काळजीपणा केला असेल तर ते खडेबोल सुनावणार यात शंका नाही. आज  सकाळी असेच घडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा दणका पुणे पोलीस व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना बसला. पोलीस मुख्यालयात इमारतीच्या डागडुजीचे कामकाजाची पाहणी करण्यास आलेले अजित पवार कामाचा दर्जा पाहून भलतेच भडकले. Ajit Pawar Gave lessons to Senior Police Officers in Pune

मला अश्या कामाच्या पाहणीला बोलवलं तर की लई बारीक बघत असतो. माझ्या भाषेतच सांगायचं तर हे "छा-छु काम" आहे. या ठेकेदाराने पोलिसांचाच काम अस केलंय तर बाकीच्यांचे कसं करत असेल, असं म्हणत दादांनी पोलीस अधिकाऱ्यांना भल्या सकाळी सुनावलं. शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालयाच्या इमारती रिनोव्हेशनच्या कामकाजाची पाहणी व कोविडमध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते होता. त्यानिमित्ताने अजित पवार भल्या सकाळी आले होते. 

त्यावेळी पाहणी करताना हे सगळे घडले. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य:त ओळखले जातात ते त्याच्या स्पष्ट बोलण्यामुळे. त्यांच्याकडे कामाच्या बाबतीत कुणाचाच मुलाहिजा ठेवत नाहीत. मग तो पक्षाचा पदाधिकारी असो वा एखादा अधिकारी. नेमकी ही प्रचिती आज पुणे पोलिसांना अनुभवायला मिळाली. मुख्यालयात आज सकाळी साडे सात वाजता अजित पवार इमारतीच्या रिनोव्हेशनची पाहणी करत होते. Ajit Pawar Gave lessons to Senior Police Officers in Pune

इंजिनिअरचं कुठं चुकलं आणि नेमकं काय झाले हे लागलीच लक्षात पवार यांच्या आले आणि त्यांनी थेट अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नावाने बोलवत अश्या कामाची पाहणीला बोलवल तर मी लई बारीक बघतो, माझ्या भाषेत बोलायचं तर हे काम छा-छु काम आहे, असं सुनावलं. भल्या सकाळी अजित पवार यांचा हा पवित्रा पाहून  अधिकाऱ्यांची मात्र धांदल उडाली. काय बोलावं आणि काय नाही हेच त्यांना समजत नव्हतं. याची चर्चा मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते खालपर्यंत सुरू झाली होती.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com