परमबीर सिंग यांची तीन प्रकरणांमध्ये गोपनीय चौकशी

परमबीर सिंग यांची तीन प्रकरणांमध्ये गोपनीय चौकशी
ACB Started discreet inquiry of Prambir singh

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या तीन तक्रारींप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) ACB गोपनीय चौकशी (डिसक्रीट इन्कायरी) करण्यात सुरवात केली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. Anti Corruption Bureau Started discreet inquiry of Parambir Singh

पोलिस Police निरीक्षक बी.आर. घाडगे, पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारींमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे Corruption आरोप केले होते. 

हे देखिल पहा - 

अशी चौकशी तीन महिन्यात पूर्ण केली जाते. ही एक प्रकारची प्राथमिक चौकशी असते. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारावर खुली चौकशी सुरू करण्यात येते अथवा गुन्हा दाखल करण्यात येतो अथवा तक्रारीची चौकशी बंद करण्यात येते. Anti Corruption Bureau Started discreet inquiry of Parambir Singh

ज्या व्यक्तींनी या तक्रारी केल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्यात येणार आहे.  पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीर सिंग यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता.  या १४ पानी पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आली होती.

पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशिरित्या आदेश दिल्याचा आरोप केला आहे. Anti Corruption Bureau Started discreet inquiry of Parambir Singh

तसेच डांगेच्या तक्रारीतही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्याशिवाय व्यावसायिक सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्याचे आरोप केले होते.  त्याप्रकरणी आता एसीबी अधिक चौकशी करत आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com