उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला

उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला
Attack on Ulhasnagar MLA's Car on Saturday

उल्हासनगर : उल्हासनगर Ulhasnagar विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला Attack झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे.यात मर्सिडीज गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. Attack on Ulhasnagar MLA Kumar Aailani Car on Saturday

शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भाजप BJP आमदार कुमार आयलानी यांचा सुपुत्र धीरज आयलानी हा मर्सिडीज MH O5 DH 5555 ही गाडी घेऊन उल्हासनगर महापालिका मागील बाजूस आंबे स्पोर्ट क्लब जवळ उभे असताना अचानक एका तरुणाने दगडाने ही मर्सिडीज गाडीवर हल्ला केला. यात धीरज आयलानी हे थोडक्यात बचावले आहेत.

परंतु गाडीचं नुकसान झालं आहे. ह्या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.हा हल्ला कोणी केला, का केला ह्याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत. Attack on Ulhasnagar MLA Kumar Aailani Car on Saturday

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com